गुजरातचं कर्ज फेडलं, आता भारतमातेचं फेडायचंय- मोदी Modi about India`s debt

गुजरातचं कर्ज फेडलं, आता भारतमातेचं फेडायचंय- मोदी

गुजरातचं  कर्ज फेडलं, आता भारतमातेचं फेडायचंय- मोदी
www.24taas.com, अहमदाबाद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा व्यक्त करून दाखवलीय आहे. भारतमातेचं कर्ज फेडणं हे केवळ मोदीचंच नव्हे तर देशाच्या प्रत्येक सुपुत्राचं कर्तव्य असल्याचं मोदींनी नमूद केलंय.

एका पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी मोदींनी भाषण केलं. या भाषणातून त्यांची पंतप्रधान बनण्याची महत्वाकांक्षा प्रतित होत होतं. मी गुजरातचं कर्ज फेडलं आता देशाचं कर्ज फेडण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया एका वक्तव्यावर त्यांनी दिली. भाजपच्या केंद्रीय समितीत मोदींची वर्णी लागलीय. त्यामुळं मोदींनी आता केंद्रात मोठी जबाबदारी पार पाडणार असल्याचे संकेत दिले आहेत.


त्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य महत्वाचं मानलं जातंय. यापूर्वीही तिसऱ्यांदा गुजरातमध्ये मुख्यमंत्री बनल्यावर आपल्या भाषणत विनोदी शैलीत दिल्लीला जाण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे आजच्या भाषणातूनही मोदींची पंतप्रधानपदाकडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळाले.

First Published: Thursday, April 4, 2013, 23:37


comments powered by Disqus