मोदींचा सोनिया गांधीवर घणाघाती आरोप Modi Accused Sonia Gandhi

मोदींचा सोनिया गांधीवर घणाघाती आरोप

मोदींचा सोनिया गांधीवर घणाघाती आरोप
www.24taas.com, सुरजकुंड

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर घणाघाती आरोप केलाय. देशातल्या कोळसा घोटाळ्याचे तार सोनिया गांधींपर्यंत पोचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीच्या आधारे, सोनियांही भ्रष्टाचारात सामील असल्याचं उघड झाल्याचा दावाही नरेंद्र मोदींनी केलाय. सोनिया गांधी अमेरिकेहून परतल्यानंतर दोनच दिवसात एफडीआयचा निर्णय कसा झाला ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असतानाच अणू करार, एफडीआय यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय निर्णय का घेतले जातात, सोनिया गांधी अमेरिकेहून आल्यावर दुसऱ्याच दिवशी एफडीआयचा निर्णय कसा घेतला गेला? असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले आहेत. सोनियांजींच्या अमेरिका यात्रेचा एफडीआयच्या निर्णयावर काही परिणाम झालाय का? असा प्रश्नही मोदींनी केलाय.

First Published: Saturday, September 29, 2012, 08:54


comments powered by Disqus