Last Updated: Monday, November 12, 2012, 12:56
www.24taas.com,नवी दिल्लीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरोधात कारस्थानाचे केंद्र गुजरातमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलयं.
मा. गो. वैद्यांनी लिहलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी नितीन गडकरींचा कैवार घेतलाय. गडकरीविरोधी कारस्थान रचले जात असून राम जेठमलानींचा करता करविता धनी नरेंद्र मोदी असल्याचं म्हटलय.
राम जेठमलानी एकाच वाक्यात गडकरींनी जावे आणि मोदींनी यावे असं म्हणतात. त्यामुळं कारस्थानाचा केंद्रबिंदू गुजरातमध्ये असल्याचं वाटतं. गुजरात म्हटलं की संशयाची सुई नरेंद्र मोदींकडे जाते असंही मा गो वैद्यांनी म्हटलय.
First Published: Monday, November 12, 2012, 12:56