‘आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या करवू शकतात नरेंद्र`Modi`Can killed his girlfriend`s boyfriend

‘आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या करवू शकतात नरेंद्र मोदी‘

‘आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या करवू शकतात नरेंद्र मोदी‘
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय. गुजरातमधील गुप्तहेर प्रकरणावरुन काँग्रेसनं मोदींना धारेवर धरलंय. काँग्रेसचे नेते हरिप्रसादनं मोदींवर थेट आरोप केलाय की, नरेंद्र मोदी आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडला मारून टाकू शकतात, म्हणून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी.

हरिप्रसाद यांनी मोदींची तुलना युगांडाचे हुकुमशहा ईदी अमीन सोबत केली. ते म्हणाले, जसं अमीन आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या करवत होते, तसं मोदी सुद्धा पीडित तरुणीच्या प्रियकराची हत्या करवू शकतात.

मोदींवर हल्लाबोल करत बी. के. हरिप्रसाद पुढं म्हणाले, झारखंडमध्ये १३ वर्षातील ७ वर्ष तिथं भाजपची सत्ता होती, तरी सुद्धा झारखंडच्या परिस्थितीला काँग्रेसला जबाबदार ठरवतायेत. मोदी फक्त खोटं बोलतात, जिथं जातात तिथं धूर्तपणा दाखवतात, असा आरोपही हरिप्रसाद यांनी केला.

हरिप्रसाद यांनी असा आरोप करण्याचं कारण म्हणजे गुजरातमधील गुप्तहेर प्रकरण होय. ज्यात नरेंद्र मोदींचे जवळचे असलेले अमित शहा यांनी एका मुलीची हेरगिरी करवली होती. त्यावेळी अमित शहा गृहराज्य मंत्री होते. पुढील तपासात हे सुद्धा पुढं आलं की अमित शहा फोनवर नेहमी कोणत्या तरी साहेबांचा उल्लेख करत होते. यावर काँग्रेसचं असं म्हणणं आहे की, अमित शहाचे साहेब म्हणजे नरेंद्र मोदी होय आणि मोदींच्या सांगण्यावरुनच त्या पीडित तरुणीवर लक्ष ठेवलं होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 30, 2013, 16:27


comments powered by Disqus