निवडणूक सभांचा आज सुपर संडे! Modi In Patna & Rahul first rally in Delhi

निवडणूक सभांचा आज सुपर संडे!

निवडणूक सभांचा आज सुपर संडे!
www.24taas.com, झी मीडिया, पटना

५ राज्यातील निवडणुकांची धामधूम सुरु झालीय. त्याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक सभांचा सुपर संडे रंगणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी सामना पाहायला मिळणार आहे.

बिहारमध्ये नरेंद्र मोदींची हुंकार रॅली होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीची दिल्लीत सभा आयोजित करण्यात आलीय. मोदी आणि राहुल गांधी पहिल्यांदाच एकाच दिवशी यानिमित्तानं सभा घेत आहेत. त्यामुळं रॅलींचा हा सुपरसंडे असल्याचं बोललं जातंय.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पाटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर दुपारी दोन वाजता मोदींची सभा होतेय. जेडीयू एनडीएमधून बाहेर पडल्यानं मोदी पहिल्यांदाच बिहारमध्ये जातील. यावेळी मोदी राहुल गांधींबरोबरच जेडीयू आणि नितीश कुमार यांच्याविषयी काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष असेल.

तर दुसरीकडे मोदींच्या आधी म्हणजे सकाळी बाराच्या सुमारास राहुल गांधी दिल्लीत सभा घेत आहेत. शहीद भगत सिंग स्टेडियमवर राहुल गांधींची सभा होणार आहे. त्यामुळं आयएसआयसंबंधी वक्तव्यानंतर मोदींकडून सुरु असलेल्या टीकेला राहूल काय प्रत्युत्तर देतात हे आज कळेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 27, 2013, 11:29


comments powered by Disqus