मोदींनी घेतली आडवाणींची भेट Modi meets Advani

मोदींनी घेतली आडवाणींची भेट

मोदींनी घेतली आडवाणींची भेट
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत लालकृष्ण अडवाणींची भेट घेतली. अडवाणी यांच्या निवासस्थानी मोदी यांनी एक तास चर्चा केली.

भाजपला आणि आपल्याला अडवाणींच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं मोदींनी अडवाणींना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचीही मोदी यांनी भेट घेतली. भाजपच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोदींची निवड झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच अडवाणींची भेट घेतली. मोदींकडं नेतृत्व दिल्यानंतर अडवाणींनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हस्तक्षेप करून अडवाणींचं मन वळवत राजीनामा मागे घेण्यास भाग पाडलं.

या पार्श्वभूमीवर मोदी यांची दिल्ली भेट महत्त्वाची मानली जातेय. अडवाणींची नाराजी दूर करण्यात मोदींना यश येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 18, 2013, 19:30


comments powered by Disqus