मोदींचा प्लॅन ‘बकवास’ – मनेका गांधी, modi plan is dangerous - maneka gandhi

मोदींचा प्लॅन ‘बकवास’ – मनेका गांधी

मोदींचा प्लॅन ‘बकवास’ – मनेका गांधी

www.24taas.com, झी मीडिया, पीलीभीत
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा नदी जोड प्रकल्पाच्या योजनेला पक्षातूनच विरोध होत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेता आणि खासदार मनेका गांधी यांनी खतरनाक आणि बकवास असल्याचे सांगितले आहे.

नदी जोड प्रकल्पाची महत्वाकांशी योजना अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात तयार झाली होती. त्यांच ती कार्यन्वीत होण्यापासून थांबविले होते, असे मनेका गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

या कार्यक्रमात एका वयस्कर व्यक्तीने गोमती आणि शारदा नदीला जोडण्याची सूचना केली होती. तेव्हा गांधीनी सांगितले की हे अत्यंत धोकादायक आहे.

विशेष म्हणजे मोदी आपल्या निवडणूक सभांमध्ये देशातील पूर आणि दुष्काळ यातून मार्ग काढण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे सांगितल होते.

गांधी यांनी सांगितले, की वाजपेयी यांना या फालतू योजनेला लागू करण्यापासून रोखले होते. या सारख्या योजनांना बकवास पेक्षा काहीच म्हटले जाऊ शकत नाही. जगात या सारखी दुसरी कोणती वाईट योजना असू शकत नाही. प्रत्येक नदीची आपली एक वैशिष्ट्य असते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात.

दोन नदींना जोडले गेले तर दोन्ही नद्या नष्ट होतील. कालवे बनविले जाऊ शकतात त्यांना साफ केले जाऊ शकते पण दोन नद्यांना जोडणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा प्रकारच्या योजना लागू करण्यासाठी जमीन कुठून येईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 15, 2014, 17:36


comments powered by Disqus