...तर राजकारणातून संन्यास घेईल-Modi using Kargil martyr`s phrase for politics: Is an apology enough?

...तर राजकारणातून संन्यास घेईल- मोदी

...तर राजकारणातून संन्यास घेईल- मोदी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला आदर आहे. हुतात्मा झालेल्या जवानांचा अपमान करण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेईल, असे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे.

हिमाचल प्रदेशात कारगिल युद्धातील हुतात्म्यांबाबत केलेल्या विधानामुळे मोदी वादात सापडले आहेत. सभेमध्ये बोलताना मोदींनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा यांचा उल्लेख केला आणि मते मागताना ‘ये दिल मांगे मोअर` असे म्हणाले होते.

मोदी म्हणाले, `विक्रम बात्रा यांच्याबद्दल अत्यंत आदरयुक्त वक्तव्ये केले होते. मात्र, राजकीय विरोधकांनी याचे राजकारण केल्याची माहिती मला नंतर मिळाली. याबद्दल मला दुःख झाले आहे.`

दरम्यान, `हिमाचलच्या मातीतील कॅप्टन विक्रम बात्रा यांनी युद्धात आपले प्राण पणाला लावले,` असे सांगून मोदींनी जास्त जागांसाठी "ये दिल मांगे मोअर` असे विधान केले होते. मोदींच्या या कोटीवर कॅप्टन बात्रा यांचे वडील जी. एल. बात्रा यांनी नाराजी व्यक्त केली आणि हुतात्म्यांच्या नावाने राजकारण केले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. माझा मुलगा शूर होता आणि त्याने देशासाठी हौतात्म्य पत्करले. आता राजकारणासाठी त्याचे नाव घेतले जात असेल, तर ते चुकीचे असल्याचे जी. एल. बात्रा यांनी नमूद केले. मोदींच्या या चुकीचा फायदा घेत कॉंग्रेसने मोदी केविलवाणे राजकीय खेळ करत असल्याची टीका केली होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 13:22


comments powered by Disqus