Last Updated: Thursday, February 7, 2013, 19:33
www.24taas.com, अलाहबादअलाहाबादमधील विश्व हिंदू परिषदेच्या धर्म परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
याप्रसंगी इशाऱ्यांमध्ये नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असल्याचं सूचित केलं आहे. मोदींचे सा-या जगानं कौतुक केलंय असं सांगत त्यांनी मोदींचं कौतुक केलं. ज्याला जनतेची साथ आहे, अशाच व्यक्तीला पंतप्रधानपदासाठी उमेदवारी द्यावी. असं सरसंघसंचालक म्हणाले.
तसंच राम मंदिराच्या मुद्यावरही भागवतांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्तेत असणाऱ्यांना राम मंदिर उभारावंच लागेल असं सांगितलं. राम मंदिर हा संपूर्ण देशाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचं भागवत म्हणाले. त्यामुळे राम मंदिर बनणारच अशी ग्वाही त्यांनी दिली.
First Published: Thursday, February 7, 2013, 19:33