गॅस दरवाढ १ एप्रिलपासून दामदुप्पट , Moily says no going back on gas price hike decision

गॅस दरवाढ १ एप्रिलपासून दामदुप्पट

गॅस दरवाढ १ एप्रिलपासून दामदुप्पट
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नैसर्गिक गॅसची दरवाढ दामदुप्पट होणार आहे. तसे संकेत पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी दिले आहेत. गॅस उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१४ पासून दरवाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दरवाढ सध्याच्या दराच्या दुप्पट आहे.

गॅस दरवाढमागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मोईली यांनी याल स्पष्टपणे विरोध केला आहे. ही गॅसदर वाढ अटळ असल्याचे ते म्हणालेत. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. केजरीवाल यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेले एफआयआर घटनाबाह्य असल्याचे ते म्हणाले.

केजरीवाल यांनी काही सेवानवृत्त अधिकार्‍यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. दरवाढ करण्याच्या निर्णयाला स्थगित देण्याचा प्रश्नच नाही. सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील गॅस उत्पादक कंपन्यांना गॅसच्या दरवाढीला परवानगी देण्याचा निर्णय शासकीय प्रक्रियेद्वारे घेण्यात आला. यावर मंत्रिमंडळाने दोनदा चर्चा केली आणि दुसर्‍यांदा ते मंजूर केले, असे मोईली म्हणाले.

नवे दर प्रति युनिट ४.२ डॉलरवरून ८ ते ८.४ डॉलर केले जाणार आहेत. केजरीवाल यांनी देशात गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि दरवाढ केल्याबद्दल मोइली, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याचे आदेश दिले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 15, 2014, 09:08


comments powered by Disqus