`पंधरा वर्षांपासून होतंय माझं लैंगिक शोषण!` molestation since last 15 years

`पंधरा वर्षांपासून होतंय माझं लैंगिक शोषण!`

`पंधरा वर्षांपासून होतंय माझं लैंगिक शोषण!`
www.24taas.com, रतनपूर

रतनपूरच्या महर्षी विद्या मंदिर या शाळेतील शिक्षिका रेणूरानी शर्मा यांनी शाळा समुहाचे अध्यक्ष गिरीश वर्मा यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मीडियासमोर या आरोपांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, की गेली पंधरा वर्षं माझ्यावर बलात्कार होत आहे तरीही पोलीस याविरोधात तक्रार दाखल करत नाहीत.

वर्मा हे एक प्रतिष्ठित आणि नामांकित व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस तयार नसल्याचं रेणूरानी यांनी म्हटलं आहे. जर आता पोलिसांनी वर्मांविरोधात तक्रार दाखल केली नाही, तर आपण मुख्यमंत्र्यांच्या घरामसोर आत्मदहन करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. जेव्हा मीडियाने रेणूरानींना प्रश्न विचारला, की १५ वर्षांत त्यांनी या शोषणाबद्दल पती आणि पोलिसांना काहीच का सांगितलं नाही, यावर रेणूरानींनी उत्तर देण्यास नकार दिला.


आपण तोंड उघडलं, तर आपल्या कुटुंबाला जीवे मारण्यात येईल, अशी वर्मांनी आपल्याला धमकी दिली असल्याचं रेणूरानींनी सांगितलं. आपले काही आक्षेपार्ह फोटोही इंटरनेटवर अपलोड करू अशी धमकी वर्मांनी दिली आहे. याशिवाय शाळेच्या काही शिक्षिका आणि विद्यार्थिनींनाही वर्मांकडे घेऊन जाण्याची जबरदस्ती आपल्यावर केली जात असल्याचे गंभीर आरोप रेणूरानींनी केले आहेत.

First Published: Tuesday, March 26, 2013, 16:10


comments powered by Disqus