Last Updated: Saturday, January 26, 2013, 19:39
www.24taas.com, जयपूरजयपूर साहित्य संमेलनात समाजशास्त्रज्ञ आणि लेखक आशिष नंदी यांनी दलित आणि ओबींसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झालाय. दलित आणि ओबीसी सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यासाठी त्यांनी पश्चिम बंगाल राज्याचे उदाहरण दिलं होतं.
बंगालच्या सत्तेत दलित, ओबीसी नसल्यामुळं तिथं भ्रष्टाचार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र देशभऱातून या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर नंदींनी माफी मागितलीय. तसंच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
वादग्रस्त वक्तव्याबद्दल लेखक आशिष नंदी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बसपा नेत्या मायावतींनी केलीय. तसंच आरपीआय नेते रामदास आठवलेंनीही त्यांच्यावर टीका केली.
First Published: Saturday, January 26, 2013, 19:38