Last Updated: Wednesday, May 22, 2013, 15:52
www.24taas.com, झी मीडिया, नैनितालझटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी आई आणि मावशीने ठेवले एका व्यापाऱ्याशी अवैध संबंध आणि या संबंधांची मुलानेच व्हिडिओ क्लिप बनवली. याद्वारे त्यांना व्यापऱ्याला ब्लॅकमेल करायचं होतं. मात्र तिघांनाही अखेर जेलमध्येच जावं लागलं.
नैनितालच्या एसएसपी यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. सितारगंज भागातील एक तरुणाने व्यापाऱ्याला आपल्या घरी बोलावलं. तिथे कोल्डड्रिंक पाजून व्यापाऱ्याला बेशुद्ध करण्यात आलं. या कोल्ड ड्रिंकमध्ये नशा आणणारा पदार्थ मिसळण्यात आला होता. नशेत असलेल्या व्यापाऱ्यासोबत आई आणि मावशीने आक्षेपार्ह अवस्थेत स्वतःच्या व्हिडिओ क्लिप्स बनवून घेतल्या. याचं शुटिंग मुलानेच केलं.
या अश्लील क्लिप्सद्वारे ब्लॅकमेल करून आधी या मुलाने व्यापाऱ्याकडून ४० लाख रुपये मागितले. ते मिळाल्यावरही त्यांचा लालचीपणा कमी झाला नाही. मात्र जेव्हा पुन्हा त्यांनी ६० लाख रुपयांची मागणी केली, तेव्हा व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित आई- मावश आणि मुलाला अटक केलं. मासीला या रकमेतील १४ लाख रुपये देण्याचं अश्वासन देऊनही आई आणि मुलाने तिला पैसे दिले नव्हते. यावरून घरात वाद सुरू होता. या दरम्यान तिघांनाही अटक करण्यात आलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, May 22, 2013, 15:52