मला नवरा हवा गं बाई... म्हणून पोटच्या पोरालाच विकलं , Mother Sold his boy for only 5000 thousand

मला नवरा हवा गं बाई... पोटच्या पोरालाच विकलं

मला नवरा हवा गं बाई... पोटच्या पोरालाच विकलं
www.24taas.com, जाजपूर

एखादी पत्नी आपल्या पतीसाठी काय करू शकते याचा आपल्याला अंदाजही येणारही नाही अशी घटना ओडिशातील जाजपूरमध्ये घडली आहे. आपला पती कैदेत आहे. आणि त्याला कैदेतून कसं सोडवयाचं या चिंतेने त्या महिलेने आपल्या पतीला सोडविण्यासाठी पैसे हवेत म्हणून आपल्या १७ महिन्यांच्या मुलाला अवघ्या ५ हजार रुपयांत विकल्याची घटना उघडकीस आली आहे. राखी पात्रा (वय २०) १३ सप्टेंबरला कटकला गेली आणि तिने जगतसिंगपूरमधील एका व्यक्तीला आपला मुलगा दिल्याचे पोलीस अधिकारी अश्विपनीकुमार साहू यांनी सांगितले.

ही घटना कळताच राखीची सासू कनकलना यांनी एफआयआर नोंदविला. त्यामध्ये आपला नातू विकल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. स्वत: राखीनेही ते मान्य केले असून, पतीला जेलमधून सोडविण्यासाठी मला पैसे हवे होते, म्हणून मी मुलाला विकल्याचे सांगितले. पतीची जामिनावर सुटका करून देण्यासाठी ५ हजार रूपये खर्च येणार असल्याचे वकिलांनी सांगितले होते, असेही तिचे म्हणणे आहे.

राखीचा पती मनोज चोरीप्रकरणी जेलमध्ये आहे. २ जुलैपासून त्याला जाजपूर जिल्ह्यातील बागडी येथील कारागृहात ठेवले आहे. मनोज आणि राखी रोजंदारीवर मजुरीकाम करतात. या घटनेनंतर सासू-सासर्यां नी घरात घेण्यास नकार दिल्याने राखीला महिलाश्रमात ठेवण्यात आले आहे. राखीच्या १७ महिन्यांच्या मुलाचा शोध सुरू आहे. मुंबईत अलिकडेच एका मातेने आपल्या पोटच्या गोळयाला पैशासाठी विकण्याचा प्रयत्न केला होता.परंतू पोलिस आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने हा प्रयत्न उधळण्यात अखेर यश आले. या प्रकरणी मुले विकत घेणार्यां्चे मुंबईतील एक रॅकेटही उदधवस्त करण्यात येऊन काही महिलांना अटकही करण्यात आली होती.


First Published: Tuesday, September 25, 2012, 10:41


comments powered by Disqus