धावत्या रेल्वेतून आईनं चिमुकल्याला फेकलं बाहेरMother throws child out of moving train

धावत्या रेल्वेतून आईनं चिमुकल्याला फेकलं बाहेर

धावत्या रेल्वेतून आईनं चिमुकल्याला फेकलं बाहेर
www.24taas.com, झी मीडिया, बरसात/पश्चिम बंगाल

धावत्या रेल्वेमधून आईनं दीड वर्षाच्या आपल्या चिमुकल्याला रेल्वेमधून बाहेर फेकल्याची घटना आज सकाळी घडली आहे. पश्चिम बंगालच्या बरसात रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे.

या घटनेत बाळ गंभीर जखमी झालंय. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोर्णिमा नावाची महिला आपला २० महिन्यांचा मुलगा आणि १४ वर्षाच्या मुलीसह रेल्वेतून प्रवास करत होती. रेल्वे नैहाती स्टेशनजवळ पोहोचताच तिनं आपल्या चिमुकल्याला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं.

बाळाला बाहेर फेकतांना रेल्वेतल्या इतर प्रवाशांनी बघितलं. या घटनेनंतर बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस तिची चौकशी करतायेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 2, 2013, 16:46


comments powered by Disqus