दिग्गीराज बावचळले, महिला काँग्रेस खासदार ‘टंच माल’, Motormouth Digvijay calls Cong MP ‘tunch maal’

दिग्गीराज बावचळले, महिला काँग्रेस खासदार ‘टंच माल’

दिग्गीराज बावचळले, महिला काँग्रेस खासदार ‘टंच माल’

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आपल्या वायफळ बडबडीने नेहमी वादात असलेले काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा आपत्तीजनक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे दिग्गी राजांनी ही वायफळ बडबड कोणा विरोधी पक्षातील नेत्यावर नाही तर स्वतःच्या पार्टीच्या महिला खासदारावर केले आहे. दिग्विजय सिंह यांनी मध्यप्रदेशच्या मंदसौरमधील एका सभेत काँग्रेसच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांना ‘१०० टक्के टंच माल’ म्हटले.

मंदसौर येथील एका जाहीर सभेत भाषण करताना दिग्विजय सिंह यांनी स्वतःला राजकारणाचा जुना जौहरी म्हटले. मला माहिती आहे, कोण खोटा आणि कोण खरा. या लोकसभा मतदार संघातील खासदार मीनाक्षी नटराजन १०० टक्के टंच माल आहे.

दिग्विजय सिंह यांनी म्हटले, मी शेवटी एवढेच सांगले की मीनाक्षी नटराजनजी तुमच्या खासदार आहेत. गांधीवादी आहेत, सरळ आहेत, इमानदार आहेत आणि सर्वांकडे जातात. गावा गावात त्यांचे जाणे आहे. मी यांच्या गावात गेलो आहे. मला ४०-४२ वर्षांचा अनुभव आहे. मी जुना जौहरी आहे.

राजकारण्यांना थोड्या गोष्टीवरून माहित पडते की कोण खरा आणि कोण खोटा आहे. खासदार बाई १०० टक्के टंच माल आहे त्या गरिबांसाठी लढत आहेत. मंदसौरच्या गटातटाच्या राजकारणात त्या पडत नाही. सर्वांना सोबत घेऊन जातात. दिल्लीमध्येही त्यांनी आपली छाप सोडली आहे. लोकसभेत आणि पक्षातही.... सोनियाजी आणि राहुलजी त्यांना मानतात. दिग्विजय सारखे नेतेही त्यांना घाबरतात. त्यामुळे या आपल्या खासदार बाईंना संपूर्ण समर्थन द्या.

मीनाक्षी नटराजन या राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे दिग्विजय सिंह यांच्या हा वक्तव्याने राजकारण होणार हे नक्की....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 26, 2013, 17:45


comments powered by Disqus