माऊन्ट अबू ‘फ्रीझ’, Mount abut freeze

माऊन्ट अबू ‘फ्रीझ’... सर्वात कमी तपमानाची नोंद

माऊन्ट अबू ‘फ्रीझ’... सर्वात कमी तपमानाची नोंद
www.24taas.com, जयपूर

आपल्यालाही थंडीची चाहूल लागली असली तर राजस्थान मात्र या थंडीमुळे पार गार झालंय. पुढच्या २४ तासांत इथली थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या, राज्यातील माऊंट अबूमध्ये तपमान सर्वांत कमी म्हणजे ४.४ डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलंय.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आज सीकरमध्ये ८, श्रीगंगानगरमध्ये ८.५, चितौडगडमध्ये ९.४, जैसलमेरमध्ये १२.२, अजमेरमध्ये १२.५, जोधपूरमध्ये १२.६, कोटामध्ये १३.२, बाडमेरमध्ये १३.४ आणि बिकानेरमध्ये १३.८ डिग्री सेल्सिअस एवढ्या तपमानाची नोंद झालीय.

येत्या २४ तासांत दिवसा आणि रात्रीच्या तपमानात याहूनंही अधिक घटण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. तर, मग तुम्हाला थंडीच्या दिवसांत बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असेल तर आता तुम्हाला आणखी एक ऑप्शन मिळालाय, नाही का...

First Published: Thursday, December 13, 2012, 15:46


comments powered by Disqus