पुजाऱ्याची करणी; महिलेवर बलात्कार करून विकलं..., MP: Married woman gang-raped, sold off for R 40000

पुजाऱ्याची करणी; महिलेवर बलात्कार करून विकलं

पुजाऱ्याची करणी; महिलेवर बलात्कार करून विकलं
www.24taas.com, छतरपूर

मध्यप्रदेशातील एका मंदिरातील पुजाऱ्यानं एका ३३ वर्षीय महिलेला किडनॅप करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. आपल्या एका सहकाऱ्याबरोबर पुजाऱ्यानं या विवाहित महिलेला छतरपूरनजीकच्या एका गावातून किडनॅप करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या महिलेला ४० हजारांत दुसऱ्या गावातील तीन भावांना विकून टाकलं.

छतरपूर जिल्ह्याची रहिवासी असलेली ही महिला १७ जानेवारीपासून बेपत्ता होती. महिलेच्या भावानं एका पाच वर्षाच्या मुलाबरोबर दुसऱ्या एका गावात बघितलं... आणि त्यानंतर हा सगळा प्रकार त्या महिलेनं आकांत करत कथन केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुजारी बालाप्रसाद शुक्लानं १७ जानेवारीला या महिलेला किडनॅप केलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ३० जानेवारी रोजी ४० हजारांत या महिलेला पीपरा गावातील विमलेश यादव, पप्पू यादव आणि वीरेंद्र यादव या तीन भावांना विकून टाकलं. यानंतर या तिघांनीही तिच्यावर गँगरेप केला.

भावाशी भेट झाल्यानंतर महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. पोलिसांना पाच जणांविरोधात तक्रार दाखल केलीय.

First Published: Wednesday, April 3, 2013, 09:39


comments powered by Disqus