'मिसेस वढेरा' अश्लील कॉल्सनी हैराण! Mrs. Wadra irked by obscene calls

'मिसेस वढेरा' अश्लील कॉल्सनी हैराण!

'मिसेस वढेरा' अश्लील कॉल्सनी हैराण!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

प्रियांका गांधी- वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या मोठ्या भावाच्या पत्नी या सध्या अश्लील फोनकॉल्समुळे हैराण झाल्या आहेत. गेले सहा महिने प्रियांका गांधीच्या जाऊबाईंना अनोळखी व्यक्ती फोन करून आचकट विटकट बोलत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला हानी करण्याचीही धमकी देत आहेत.

सोनिया गांधीचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या मोठ्या भावाचा- रिचर्ड वढेरा यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यांची पतनी सायरा वढेरा आणि त्यांची मुलं यांच्या सुरक्षेसाठी २४ तास महिला होमगार्ड तैनात असतात. गेले सहा महिने सायरा वढेरा यांना अनोळखी नंबरवरून फोन येत असून पलिकडील व्यक्ती अश्लील आणि अर्वाच्य भाषेत बोलून लागते. कधी मैत्री करण्याची ऑफर दिली जाते, तर कधी क्षेपार्ह गोष्टी बोलल्या जातात. नोकरांनी फोन उचलला, तर त्याला शिव्या ऐकायला मिळतात.

गांधी कुटुंबाच्या नात्यातील असूनही वाढेरा कुटुंबाला या अनोळखी व्यक्तींचा शोध लावण्यात अपयश आलं आहे. अखेर त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. हायप्रोफाइल कुटुंबाला अशा प्रकारचा त्रास होत असल्याचं समजताच पोलिस यंत्रणा ताबडतोब कामाला लागली आहे. पोलिसांना दोन नंहरांवर संशय आहे. हे दोन नंबर कुणाचे आहे, याची चौकशी चालू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013, 17:22


comments powered by Disqus