Last Updated: Monday, October 7, 2013, 12:39
www.24taas.com , झी मीडिया, लखनऊ२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतलाय.
प्रत्येक निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची चर्चा होते. मात्र निवडणूकपूर्व आघाडी होत नाही. यावेळीही तिसरी आघाडी निवडणुकांनंतरच स्थापन करण्यात येईल अशी माहिती मुलायमसिंह यादव यांनी दिलीय. सीपीआयचे महासचिव प्रकाश करात आणि इतर डाव्या नेत्यांशी त्याबाबतीत चर्चा सुरू असल्याचं यादव यांनी सांगितलंय.
आगामी निवडणुकीत काँग्रेस किंवा भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं छोट्यामोठ्या पक्षांना सोबत घेऊन तिसऱ्या आघाडीसाठी मुलायमसिंह यादव आणि डाव्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 7, 2013, 12:39