Last Updated: Saturday, October 13, 2012, 09:21
www.24taas.com, लखनौसमाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी भष्ट्राचाराला खुलेआम पाठिंबा दिला आहे. मंत्र्यांनी कामे करावीत. ती करताना मग थोडा पैसा खाल्ला तर त्याला आपली कसलीच हरकत नाही, असे मुलायम यांनी राम मनोहर लोहिया यांच्या स्मृतिदिन समारंभात बोलताना जाहीररीत्या सांगितले.
माझ्या पक्षाच्या मंत्र्यांकडे अकार्यक्षम म्हणून लोकांनी बोटे दाखवता कामा नये, असे बजावताना ते म्हणाले की, कामे होत असतील तर पैसे खाल्ल्याने काही बिघडत नाही. काम किजिए, कमा लिजिए, खा लिजिए... ही गोष्ट तुम्हाला मी वारंवार सांगत आलोय.
याआधी उत्तर प्रदेशात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले मुलायमसिंग बंधू शिवपाल यादव यांनीही अधिकार्यांना असाच उपदेश केला होता. तुम्ही मनापासून कामे केली तर तुमच्या चोर्यामार्या पोटात घालू. फक्त मोठे दरोडे घालून लूट करू नका, असा सल्ला त्यांनी दिला होता.
First Published: Saturday, October 13, 2012, 09:11