मध्यप्रदेश गृहमंत्र्यांच्या घराजवळ मुलीचा खून, Murder in front of home minister house

मध्यप्रदेश गृहमंत्र्यांच्या घराजवळ मुलीचा खून

मध्यप्रदेश गृहमंत्र्यांच्या घराजवळ मुलीचा खून
www.24taas.com, भोपाळ

मध्यप्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या निवासस्थानापासून जवळजवळ ६० मीटर दूर काल एका आठ वर्षीय मुलीचं छिन्नविच्छिन्न अवस्थेत शव आढळून आलं.

पोलीस सुत्रांच्या मते, गृहमंत्र्यांच्या निवासापासून थोड्याच अंतरावर काल दुपारी एका कुत्र्याला मुलीचा हात घेऊन जाताना पाहून संशय आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून तेथे चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांना नाबालिग मुलीचं शव आढळून आलं

आरोपीने मुलीचं डोकं दगडाने ठेचून अत्यंत क्रूररित्या तिची हत्या केली. त्यानंतर तेथील जनावरांनी तिच्या शरीराचे काही अवयव खाऊन टाकले. पण मुलीच्या कपड्यावरून तिची ओळख पटवली. काजल धुरिया असं त्या मुलीचे नाव असल्याचे समजते. परिवारातील लोकांच्या सांगण्यानुसार काजल रविवारी रात्री आपल्या छोट्या भावाबरोबर जत्रेत गेली होती.

मात्र रात्री तिचा भाऊ परत आला आणि काजल परतलीच नाही. पोलिसांच्या मते, मुलींच्या कोणीतरी ओळखीचं जत्रेत भेटलं असणार. आणि त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिची हत्या केली. पोलीस आरोप शोध घेत आहेत. मात्र त्याचसोबत जो कोणी आरोपीबाबत माहिती दिल्यास त्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

First Published: Tuesday, February 5, 2013, 17:26


comments powered by Disqus