धर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!Muslim Couple married in Temple in UP

धर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!

धर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!
www.24taas.com, वृत्तसंस्था, एटा, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये प्रेमासमोर मोठ्या विरोधाचा अखेर पराभव झालाय. धर्माचं बंधन तोडत एका प्रेमीयुगुलाचा निकाह चक्क मंदिरात झाला. या विवाहाला काजी साहेबांसोबत दोन्ही तरुणांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

एटामध्ये अवागढ इथं राहणारा तरुण मोहल्ल्यातीलच तरुणीवर प्रेम करू लागला. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मागील बुधवारी दोघंही आपलं नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी अवागढहून पळून गेले. त्यांचा खूप शोध घेतला गेला. पोलीसही त्यांचा तपास करत होते.

नंतर अचानक हे प्रेमीयुगुल सोमवारी अवागढच्या साई मंदिरात पोहोचलं. दोघांचे कुटुंबियही तिथं आले आणि विरोध करू लागले. मात्र खूप समजावल्यानंतर दोघांचे कुटुंबिय त्यांच्या लग्नासाठी तयार झाले. अखेर मंदिरातच काजी साहेबांना बोलावून त्यांचा निकाह करण्यात आला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 16:32


comments powered by Disqus