मुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू : राजनाथ Muslim, rajnath and bjp

मुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू : राजनाथ

मुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू : राजनाथ

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं भाई-चा-याचा सूर आळवलाय.

भूतकाळात जर भाजपकडून काही चुका झाल्या असतील तर मुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू, असं वक्तव्य भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलंय.

मात्र भाजपला एकदा संधी द्या असं आवाहन राजनाथ यांनी मुस्लिम समाजाला केलंय.

दिल्लीत मुस्लिमांच्या एका कार्य़क्रमाला राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेस चुकीचा प्रचार करत आहे. त्यामुळं काँग्रेसच्या प्रचाराला बळी पडू नका असंही त्यांनी सांगितलं.

कोणत्याही पक्षाचं सरकार बनवण्यासाठी निवडणुका नाहीत, तर देश बनवण्यासाठी निवडणुका असल्याचंही यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

भारत दंगा मुक्त होईल, असा दावाही यावेळी त्यांनी केला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 25, 2014, 23:41


comments powered by Disqus