Last Updated: Wednesday, August 21, 2013, 17:09
www.24taas.com, झी मीडिया, आमरोहागुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू उत्तर प्रदेशातही चांगलीच चालली. उत्तर प्रदेशातील अमरोहा या गावातील मुस्लिम महिलांनी नरेंद्र मोदींना दहा मीटर लांब राखी पाठवली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आपलं संरक्षण करतील, अशी आशा या राखीसोबत त्यांनी व्यक्त केली आहे.
अमरोह्यातील हिंदूंबरोबरच मुस्लिम बहुल नौगावा या गावात मोदींच्या मुस्लिम चाहत्यांनी मोदींवर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. या शहरातील अनेक मुस्लिम महिलांनी मोदींना आपला भाऊ मानला आहे. याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचीही संमती आहे.
रक्षाबंधनाला ही राखी पाठवून आपल्याप्रती असणाऱ्या कर्तव्याची आठवण करून दिली आहे. तसंच आपल्या गावी येण्याचंही आमंत्रण या मुस्लिम महिलांनी केलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असणाऱ्या रियाज अब्बास आब्दी यांनी सर्व महिलांच्या समोर ही राखी मोदींना कुरियर केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 21, 2013, 17:09