मुझफ्फरनगर दंगलीत ३१ ठार, दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश,Muzaffarnagar toll mounts to 31, violence spreads to more

मुझफ्फरनगर दंगलीत ३१ ठार, दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश

मुझफ्फरनगर दंगलीत ३१ ठार, दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश
www.24taas.com , झी मीडिया, लखनऊ

उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर परिसरामध्ये उसळलेली दंगल अद्याप पूर्णपणे शमलेली नाही. आजही तणाव कायम आहे. सोमवारी दुपारपर्यंत बळी गेलेल्यांचा आकडा ३१वर पोचला आहे. तर दंगेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेत.

शामली जिल्ह्यामध्येही दंगलीचे लोण पोचले असून अखिलेश सरकारला परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याची टीका होत आहे. दरम्यान राज्य सरकारला लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन केंद्राने दिले असून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखिलेश यादव यांच्याशी याप्रश्नी चर्चा केली.

मुझफ्फरनगर आणि शामलीमधील शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लष्कराने ध्वजसंचलन केले आहे. मुजफ्फरनगरच्या काही भागांत आजसुद्धा दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्षाच्या घटना घडल्या. यात जखमी झालेले तसेच विविध रुग्णालयांमध्ये भरती जखमींपैकी आठ जण दगावले. आतापर्यंत एकूण ३१ लोक ठार आणि जवळपास ५० जण जखमी झाले आहेत.

पुन्हा हिंसाचार सुरू झाला तर दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या सिव्हिल लाईन्स, कोतवाली आणि नई मंडी क्षेत्रांमध्ये संचारबंदी जारी आहे. या ठिकणी तणाव कायम आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 10, 2013, 08:13


comments powered by Disqus