Last Updated: Monday, February 3, 2014, 16:40
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर भर दिवसा चौकात एक पुरूष आणि एका महिलेने निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान कार्यालयातही घुसण्याचा या महिला आणि पुरूषाने प्रयत्न केला.
पोलिसांनी त्यांच्या अंगावर शॉल टाकून त्यांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं सांगून, त्यांना राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.
या दोनही जणांचा कपडे काढण्याचा ड्रामा ३५ मिनिटं चालला असल्याचं सांगण्यात येतं, हे बनारसचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय
चित्रात दिसत असलेल्या महिला आणि पुरूषाने या आधीही आंदोलन केलं असल्याचं सांगण्यात येत, देशात भेदभाव माजला आहे, भ्रष्टाचार वाढला आहे.
आम्हाला पंतप्रधान, राष्ट्रपती यांना भेटायचे आहे, असं या पुरूष आणि महिलेने पोलिसांना सांगितले. या दोनही जणांची मानसिक स्थिती योग्य नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे हे चौकशीनंतरच समजेल असं पोलिसांनी सांगितलं आहे. यापूर्वीही या दोन जणांना आंदोलन करतांना पाहण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 3, 2014, 16:35