नरेंद्र मोदींची टीका योग्य नाही - अडवाणी, Narendra Modi `aggressive `on the advice Advani

नरेंद्र मोदींची टीका योग्य नाही - अडवाणी

नरेंद्र मोदींची टीका योग्य नाही - अडवाणी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका योग्यवेळी नव्हती. स्वातंत्र्यदिनी त्यांनी टीका करणे योग्य नाही, अशी नाराजी भाजपचे ज्येष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली. मोदींना हा घरचा आहेर असल्याचे म्हटले जात आहे.

मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाबाबत अडवाणी यांनी नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यदिन हा एकमेकांवर टीका करण्याचा दिवस नाही. स्वातंत्र्यदिनी वैयक्तिक टीका करणे टाळले पाहिजे, असे आडवाणी म्हणाले.

मी पंतप्रधानांचे भाषण ऐकले आहे. भारताकडे मोठी क्षमता आहे, असे सांगून अडवाणी यांनी ही टीकेची योग्य वेळ नाही म्हटले. मोदी यांनी भूज येथे ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधानांवर टीका केली होती. त्यानंतर आडवाणी यांनी नाराजी व्यक्त करणे म्हणजे भाजपमधील वाद पुन्हा चव्हाटय़ावर आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 16, 2013, 09:36


comments powered by Disqus