आहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदीNarendra Modi attends Ahana Deol’s wedding

आहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी

आहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता धर्मेंद्र आणि `ड्रीमगर्ल` हेमा मालिनी यांची दुसरी मुलगी आहना देओलचा रविवारी शाही थाटात विवाह संपन्न झाला. आहनाचं लग्न वैभव व्होरा याच्यासोबत झाला. या लग्नाला अवघं बॉलिवूड, राजकीय नेते आणि बिझनेस जगतातील मोठमोठे दिग्गज उपस्थित होते. या विवाहसोहळ्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा सहभागी होते.

लग्नसमारंभाला इतर अनेक नेते-अभिनेते उपस्थित होते. मात्र सर्वांचा आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू होते नरेंद्र मोदी. मोदींना बघण्यासाठी सगळ्यांमध्ये खूप उत्सुकता दिसत होती.

मोदी यांच्याव्यतिरिक्त योगगुरू रामदेव बाबा, अमर सिंह, बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि अभिनेत्री रेखा या सुद्धा उपस्थित होत्या. सोनाक्षी सिन्हा आपली आई पूनम सोबत आली होती. याशिवाय जावेद अख्तर, शबाना आझमी, सुब्रतो राय, अनिल अंबानी, टीना अंबानी, जितेंद्र, अनुपन खेर , किरण हे सुद्धा लग्नाला उपस्थित होते.

आहना-वैभवचं लग्न हे तमिळ आणि पंजाबी दोन्ही पद्धतीनं झालं. वैभव व्होरा हा पंजाबी आहे तर आहना आधी पंजाबी आणि आधी तमिळ आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 3, 2014, 17:05


comments powered by Disqus