नरेंद्र मोदींनी बालपणी घरी आणली होती जिवंत मगर ‘Narendra Modi brought home a crocodile’

नरेंद्र मोदींनी बालपणी घरी आणली होती जिवंत मगर

नरेंद्र मोदींनी बालपणी घरी आणली होती जिवंत मगर
www.24taas.com, अहमदाबाद

गुजरातचे विकास पुरूष म्हणून नावाजलेले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे लहानपणीसुद्धा शूर आणि निडर असल्याचं त्यांचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितलं. लहानपणी नरेंद्र मोदी घरी जिवंत मगर घेऊन आल्याचं त्यांनी सांगितलं.

67 वर्षीय सोमाभाई मोदी यांनी आपल्या भावाच्या कर्तबगारीबद्दल बोलताना त्यांच्या लहानपणीच्या आठवणंनाही उजाळा दिला. बालपणी जवळच्या एका तलावातून मोदींनी चक्क एक लहान मगर उचलून घरी आणली होती. ते पाहून अर्थातच घरचे लोक खूप घाबरले. आई ओरडल्यामुळे अखेर ती मगर त्यांनी सोडून दिली.

याशिवाय नरेंद्र मोदींबद्दल बोलताना सोमाभाई म्हणाले, की नरेंद्र मोदींची तुलना गुजरातच्या इतर कुठल्याच मुख्यमंत्र्यांशी होऊ शकत नाही. मोदींनी केलेला विकास त्यांना तिसऱ्यांदा निवडून आणू शकतो. तसंच, नरेंद्र मोदींच्या हुकुमशाहीबद्दल विचारलं असता सोमाभाई म्हणाले, “नरेंद्र लहानपणापासूनच शिस्तप्रिय आणि दृढनिश्चयी होता. त्याने एखादी गोष्ट करायची मनाशी ठरवलं, की तो ती केल्याशिवाय कधीच शांत बसत नाही.”

First Published: Wednesday, December 5, 2012, 16:12


comments powered by Disqus