पराभव झाला तर पुन्हा चहा विकेन - नरेंद्र मोदी NARENDRA MODI IN AMETHI

पराभव झाला तर पुन्हा चहा विकेन - नरेंद्र मोदी

पराभव झाला तर पुन्हा चहा विकेन - नरेंद्र मोदी

www.24taas.com, झी मीडिया, अमेठी

नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसचा बालेकिल्ला अमेठीत सभा घेतली, सभेत त्यांनी गांधी घराण्यावर जोरदार हल्लाबोल केला.

लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असल्याने नरेंद्र मोदी अधिक खुलून बोलत असतांना दिसून आले.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं अनेक जण मला विचारतात, तुमचा पराभव झाला तर काय करणार, माझा पराभव झाला तर मी पुन्हा चहा विकेन, असं नरेंद्र मोदी यांनी आज अमेठीतील भर सभेत सांगितलं.

तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांनी मीडिया वाल्यांना एक चॅलेन्जही केला. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांना एका बाजूला उभं करा, आणि सर्व गांधींना एका बाजूला उभं करा आणिअमेठी मतदार संघातील गावांची नावं विचारा, स्मृती इराणी तुम्हाला शंभर गावांची नावं तरी सांगेल, पण गांधी परिवारातले सदस्य दहापेक्षा जास्त गावांची नावंही तुम्हाला सांगू शकणार नाहीत, असा माझा दावा आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

अपडेट अमेठीत आज नरेंद्र मोदी यांची सभा झाली. नरेंद्र मोदी यांनी अमेठीत मांडलेले मुद्दे

अमेठीच्या समस्या कमी करण्यासाठी स्मृती ईराणींना भाजपची उमेदवारी- मोदी

आई आणि मुलाचं सरकार जाणार हे सर्व देशाला माहित आहे - मोदी

अमेठीतून कमळ पाठवा, भाजप मजबूत करा-मोदी

आठ ते नऊ महिन्यातून अमेठीचा प्रचंड विकास करणार - मोदी

अमेठीचा एवढा विकास करणार की विकासाचा मार्ग अमेठीतून जाणार - मोदी

स्मृती इराणींच्या बाजूला संपूर्ण गांधी कुटुंब उभं करा, हे सर्व कुटुंब अमेठीतील दहा गावांची नावं ही सांगू शकणार नाही, स्मृती इराणी 100 गावांची नावं तरी सांगतील, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

लुटणाऱ्यांपेक्षा मागणारा कधीही सर्वश्रेष्ठ

सोनिया म्हणतात, मोदींनी स्वत:ला पीएम मानलंय, मी सोनियांनी एवढंच म्हणेल, मॅडम सोनियाजी तुमच्या 'तोंडात साखर पडो' - मोदी

अमेठीत बदला घ्यायला नाही, विकासाचा बदल करण्यासाठी आलो आहे.

ही निवडणूक राजकीय पंडितांचे अंदाज चुकवणारी - मोदी

स्मृती ईराणी आहे कोण असं कुणी विचारत असेल, तर स्मृती इराणी माझी लहान बहिण आहे.

स्मृती इराणी अमेठीत पाप धुण्यासाठी आली आहे- मोदी

वंश वाद, भाऊ-भाच्याचा वाद तुम्हाला हवा आहे - मोदी

चाळीस वर्षात एका परिवाराने अमेठीत तीन पिढ्या बर्बाद केल्या, मी नव्या पिढीची स्वप्न साकार करण्यासाठी इथे आलो आहे-मोदी

चांगले दिवस लवकरच येणार आहेत - नरेंद्र मोदी

गरीब असणे गुन्हा आहे का, चहा विकणे गुन्हा आहे का? मला यांनी गुन्हेगार ठरवणार - नरेंद्र मोदी

मुलाला राजकारणात सेटल करण्यासाठी आईने दहा वर्ष अथक प्रयत्न केले, मी समजू शकतो-नरेंद्र मोदी

सोनियांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या अंतिम संस्कारासाठी दिल्लीत जागा दिली नाही - मोदींचा आरोप

सोनियांनी जातीचं कार्ड खेळलं आणि सीताराम केसरी मागासवर्गीय होते, म्हणून त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवलं - नरेंद्र मोदी

2019 मध्ये अमेठीच्या विकासाचा हिशेब स्वत: येऊन देणार -नरेंद्र मोदी

मी हरलो तर माझं काय, मी पराभूत झालो, तर पुन्हा चहा विकीन - नरेंद्र मोदी

राजीव गांधींनी तत्कालीन आँध्रच्या मुख्यमंत्र्यांना रडवलं होतं - नरेंद्र मोदी


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 16:43


comments powered by Disqus