ममतादीदींपुढे नरेंद्र मोदींचा हात, narendra modi in kolkata

ममतादीदींपुढे नरेंद्र मोदींचा हात

ममतादीदींपुढे नरेंद्र मोदींचा हात
www.24taas.com, कोलकाता

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुस्तीसुमने उधळललीत. मोदींनी मैत्रीसाठी हात पुढे केल्याचे दिसून येत आहे.

मोदी हे निवडणुकीनंतरची गणिते सोडविण्यासाठी आतापासून गणिते मांडत आहेत. त्याची सुरूवात कोलकातापासून केलीय. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी मंगळवारी ममता बॅनर्जी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत मैत्रीचा हात केलाय. ममता यांचे सरकार पश्चिम बंगालच्या जनतेचे विकासाचे स्वप्न नक्कीच पूर्ण करील, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. तर दुसरीकडे डाव्या आघाडीच्या सरकारचे वाभाडे काढत त्यांनी ममतांना खूश करण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे मोदी यांना नव्या मित्रांच्या पाठिंब्याशिवाय दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचू शकत नाही, याची जाणीव असल्याने नवे अभियान हाती घेतल्याचे दिसत आहे. मोदी देशातील विविध राज्यांत फिरत असून नव्या राजकीय मित्रांना साद घालत आहेत.

गुजरातमध्ये काँग्रेसने करून ठेवलेले खड्डे भरायला मला १० वर्षे लागली. पश्चिम बंगालमध्ये तर डाव्यांनी ३२ वर्षे खड्डे खोदण्याचे काम केले आहे. हे खड्डे भरायला सध्याच्या सरकारला किती वेळ लागेल सांगता येत नाही. असे असले तरी सध्याच्या सरकारचा कारभार उत्तम चालला आहे. हे सरकार राज्यातील जनतेचे स्वप्न नक्कीच पूर्ण करील, असा विश्वास मोदींनी केलाय. त्यामुळे केंद्रातील सरकारमधून ममता बाहेर पडतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर मोदींनी घातलेली साद ममता बॅनर्जी ऐकतील का, याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.

First Published: Tuesday, April 9, 2013, 19:12


comments powered by Disqus