`नमो`चा आज लखनऊमध्ये शंखनाद..., narendra modi in Lucknow

`नमो`चा आज लखनऊमध्ये शंखनाद...

`नमो`चा आज लखनऊमध्ये शंखनाद...
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज लखनऊमध्ये विजय शंखनाद सभा होणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी  प्रदेश भाजपनं जय्यत तयारी केलीय.

मोदींच्या या खास सभेसाठी २९ विशेष रेल्वेगाड्यांची सोय करण्यात आलीय. तसंच साडे चार हजार बस तसंच २५ हजारांपेक्षा जास्त खासगी वाहनांचीही सोय करण्यात आलीय. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाला मोदी आज आजच्या सभेत मुख्य लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयपेयी हे लखनऊचे खासदार होते. त्यामुळे वाजपेयींच्या मतदारसंघात होणाऱ्या मोदींच्या सभेला भावनिक महत्त्वही आहे. सभेच्या ठिकाणीही वाजपेयींचे भव्य चित्र लावण्यात आलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 2, 2014, 09:37


comments powered by Disqus