अडवाणी-मोदी एकाच व्यासपीठावर, मतभेद मिटले?Narendra Modi, LK Advani to share dais in Ahmedabad today

अडवाणी-मोदी एकाच व्यासपीठावर, मतभेद मिटले?

अडवाणी-मोदी एकाच व्यासपीठावर, मतभेद मिटले?
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हे दोघं एकत्र दिसतील.

साबरमती नदीकिनारा विकास योजनेअंतर्गत अहमदाबाद इथं दोन अत्याधुनिक उद्यानांची निर्मिती करण्यात आलीय. चाळीस कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करून उभारण्यात आलेल्या या उद्यानांचं आज लोकार्पण केलं जाणार असून, यानिमित्तानं अडवाणी आणि मोदी एकत्र येणार आहेत. अगदी वेळेवर अडवाणींच्या दौऱ्याचं आयोजन केलं गेलं असल्याचं कळतंय.

यापूर्वी शहरातील सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचा महिन्यापूर्वी लोकार्पण सोहळा होणार होता. हा कार्यक्रमही अडवाणी आणि मोदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. मात्र, दोन्ही नेत्यांनी तेव्हा एकत्र येण्याचं टाळलं होतं. त्यामुळंच आता उद्यानांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांना एकत्र आणलं जातंय.

अडवाणी आणि मोदींमधले मतभेद दूर झाले, हे दाखविण्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेल्याचं बोललं जातंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013, 13:06


comments powered by Disqus