Last Updated: Sunday, October 21, 2012, 16:59
www.24taas.com, नागपूर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अचानक नागपूरात येऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा एक मोठा चर्चेचा विषय ठरलाय.
रा. स्व. संघाच्या मुख्यालयात तब्बल तीन तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं समजतंय. गुजरात निवडणूक तसंच भाजपाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून सुरू असलेली मोदींच्या नावाची चर्चा, यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. मात्र, ‘या भेट राजकीय नव्हती... कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा यावेळी झाली नाही. भागवत आणि भय्याजी जोशी यांची भेट घेण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती’ असं स्पष्टीकरण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलंय.
भाजपनंही या भेटीची जाहीर चर्चा करणं टाळलंय. ‘अनेक नेते सरसंघचालकांशी चर्चा करण्याझसाठी येतच असतात. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या भेटींना फारसं महत्त्व देऊ नये’असं मत व्यक्त केलंय भाजपचे प्रवक्त मुख्तार मुख्तायर अब्बांस नक्वी यांनी... मात्र, गुजरातच्या विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना प्रचार सोडून नरेंद्र मोदी यांनी ‘आरएसएस’च्या नेत्यांची घेतलेली ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जातेय.
First Published: Sunday, October 21, 2012, 16:59