नरेंद्र मोदींची पाटण्यात टी स्टॉलवर ‘छाप’,Narendra Modi on the Tea Stall In Patana

नरेंद्र मोदींची पाटण्यात टी स्टॉलवर ‘छाप’

नरेंद्र मोदींची पाटण्यात टी स्टॉलवर ‘छाप’
www.24taas.com , वृत्तसंस्था, पाटणा

सध्या देशात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची क्रेझ वाढलेली दिसून येत आहे. बिहारमधील पाटण्यामध्ये आता रस्त्याच्याकडेला असणाऱ्या टी स्टॉलवर मोदींची छाप दिसणार आहे. ‘नमो टी स्टॉल` उभारण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

मोदींची ‘हुंकार रॅली` २७ऑक्टोीबर रोजी काढण्यात येणार आहे. या रॅलीची जोरदार तयारी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. मोदींच्या प्रचारासाठी बिहारी नेत्यांनी रस्त्यांच्या कडेला असलेल्या चहाच्या दुकानांना ‘नमो टी स्टॉल` नाव देण्याची नामी शक्कल लढविली आहे.

मोदी स्वतः चहाच्या दुकानात काम करत होते त्या मोदींचे नाव आज पंतप्रधानपदासाठी घेतले जात असल्याचा अभिमान असल्याचे काही दुकानदारांनी सांगितल्याची माहिती भाजपचे बांकीपूरचे आमदार नितीन नवीन यांनी दिली. मोदींच्या रॅलीपर्यंत चारशे चहा स्टॉल्समध्ये मोदींची भित्तिपत्रके लावण्याचा निर्धार नवीन त्यांनी केला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, October 4, 2013, 11:40


comments powered by Disqus