जातीय हिंसाचार विधेयक विरोधात मोदींचं पंतप्रधानांना पत्रNarendra Modi opposes Communal Violence Bill

जातीय हिंसाचार विधेयक विरोधात मोदींचं पंतप्रधानांना पत्र

जातीय हिंसाचार विधेयक विरोधात मोदींचं पंतप्रधानांना पत्र
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणारेय. मात्र भाजपनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच जातीय हिंसाचार विधेयकावर प्रश्न उपस्थित केलेत... नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांना पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केलेत...

नरेंद्र मोदींनी जातीय हिंसाचार विधेयक सादर करण्याची सरकारची वेळ चुकीची असल्याची टीका केलीय. या विधेयकामागं व्होटबँकेचं राजकारण असल्याचं मोदींनी म्हटलंय. जर हे विधेयक राज्यांमध्ये लागू करायचं असल्यास राज्याराज्यांनाच याबाबत कायदा का? करू दिला जात नाही असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

या विधेयकामुळं जातीय हिंसाचार वाढून समाजात फूट पडेल आणि हिंसात्मक घटनांमध्ये मोठी वाढ होईल अशी टीका मोदींनी केलीय. या विधेयकाबाबत पुढं जाण्याआधी केंद्र सरकारनं आधी राज्य आणि संबंधित पक्षांशी चर्चा करण्याची मागणीही मोदींनी केलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 12:21


comments powered by Disqus