Last Updated: Wednesday, June 12, 2013, 15:12
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे निवडणूक प्रचाराची सूत्र आल्यामुळे भाजपचा मित्रपक्ष जेडीयू नाराज आहे. तसेच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एनडीएशी संबंध तोडण्याची तयारी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी चालवल्याची सूत्रांची माहिती आहे.
नितीशकुमारांनी तात्काळ आपल्या आमदारांना बोलावणे धाडले आहे. याचाच एक भाग म्हणून १५ तारखेला जेडीयूच्या सर्व आमदारांना नितीश कुमार यांनी पाटण्यामध्ये पाचारण केल्याचं समजतंय. दरम्यान, बिहारचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय. भाजपनं चुकीच्या व्यक्तीकडे सूत्रं सोपवल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. त्यामुळं जेडीयु आणि एनडीएचं नातं तुटल्यात जमा असून येत्या २ दिवसांत त्यावर निर्णय येईल असे संकेत सिंह यांनी दिलेत.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी NDAवर जोरदार टीका केलीये. NDAचं अस्तित्वच शिल्लक राहिलेलं नाही. सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच भूमिका महत्त्वाची राहिली आहे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागलीये. सहपरिवार त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 12, 2013, 15:12