नरेंद्र मोदींचं मिशन, पाटण्यामध्ये सांत्वन, Narendra Modi`s Mission Santvana

नरेंद्र मोदींचं मिशन, पाटण्यामध्ये सांत्वन

नरेंद्र मोदींचं मिशन, पाटण्यामध्ये सांत्वन
www.24taas.com, झी मीडिया, पाटणा

पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची नरेंद्र मोदींनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच भाजपच्या वतीने त्यांनी मृतांच्या वारसास पाच लाखांचा चेकही दिला.

दरम्यान पाटण्यात धुके पसरल्यामुळे मोदींचा दौरा नियोजीत वेळेपेक्षा दीड तास उशीराने सुरु झाला. मोदींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पाटण्यात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. मोदींच्या रविवारी झालेल्या सभेदरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान सहाजण ठार तर 82 जण जखमी झाले होते त्या पार्श्वभूमीवर मोदींनी आजच्या दौ-याचं आयोजन केलं होतं...

दरम्यान मुन्ना श्रीवास्तव यांच्या पत्नीशी मोदींनी फोनलाईनवरून संपर्क साधून त्यांचं सांत्वन केलं.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, November 2, 2013, 22:45


comments powered by Disqus