Last Updated: Tuesday, April 29, 2014, 08:46
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबादगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेकओव्हरवर त्यांचे फॅन्स आणि युवकच प्रभावित नाहीत तर मोठ-मोठे फॅशन डिझायनर्सवरही त्यांनी मोहिनी घातलीय. त्यामुळं मोदींच्या ड्रेसिंग सेन्सवर केवळ चर्चा न करता या डिझायनर्सनी त्यांच्यासाठी ड्रेस डिझायनिंग करण्याचीही इच्छा व्यक्त केलीय.
वेगवेगळे कुर्ते वापरणे हा मोदींचा फॅशन सेन्स आहे. ज्यामुळं ते फॅशनचा ट्रेंडच बनत चालले आहेत. मोदी प्रत्येक रॅलीत वेगळा कुरता घालतात. अपवादानेच त्यांचा कुर्ता एखाद्या रॅलीत रिपीट होतो. अनेकदा तर दिवसात त्यांच्या चार रॅल्या असतील तर ते चार वेगवेगळे कुरत्यात दिसतात.
केवळ वेगवेगळ्या रॅल्यांसाठीच नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठीही मोदींकडे वेगळ्या प्रकारचे अनेक ड्रेस आहेत. नरेंद्र दामोदरदास मोदी आज एक असे फॅशन आयकॉन बनलेले आहेत की ज्यांची चर्चा मोठ-मोठ्या फॅशन डिझायनर्समध्येही रंगलेली आहे. एक साधा कुर्ता आणि एक जॅकेट फॅशन डिझायनर्सना प्रभावित करत असल्याचं चित्र देशात पहिल्यांदाच दिसतंय. मात्र रोहित वर्मांसारख्या फॅशन डिझायनिंगच्या जाणकारांच्या मते मोदी हे फॅशनचा उत्तम कॉम्बो पॅक आहेत.
कर्ता, जॅकेट, घड्याळ आणि चष्मा मोदींच्या या साधेपणावर चे रोहित एवढे फिदा झाले आहेत की ते आता आपल्या फेव्हरेट मोदींना सूट-बूट आणि टायवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मोदींनी नक्कीच नाईलाजानं अर्ध्या बाह्यांचा कुर्ता घालायला सुरूवात केली असेल. मात्र आता फॅशन आयकॉन बनलेल्या मोदींचं कौतुकही ऐका.
कपड्यांच्या दुकानांपासून फॅन डिझायनर्सच्या बुटीकपर्यंत केवळ मोदींचाच बोलबाला आहे. फॅशन डिझायनर्स जरी मोदींच्या व्यक्तीमत्वात हरवून गेलेले असले तरी मतदारांवर मोदी लाटेचा काय परिणाम होतोय याचे उत्तर १६ मेलाच मिळणार.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 29, 2014, 08:44