Last Updated: Sunday, September 22, 2013, 10:26
www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगरभारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी युपीए सरकारवर तोफ डागलीय. देशातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला हटविण्यासाठी १९७७ प्रमाणे २०१४मध्ये नागरिकांनी पुढं येऊन परिवर्तन होण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. मोदींना आज परदेशातील भारतीय नागरिकांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाचा विकासदर ८.४ टक्के होता, आता तो यूपीए सरकारच्या काळात ४.८ टक्क्यांवर आलाय. त्यामुळं सध्याच्या या परिस्थितीतून फक्त भाजपच देश वाचवू शकतो. कारण, भाजप कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असून देशाला सर्वोतोपरी चांगलं करण्याची तयारी असल्याचं, मोदी यांनी सांगितलं.
यूपीए सरकारनं गेल्या नऊ वर्षांतील कामकाजाचा आढावा जनतेसमोर मांडावा, असं आवाहन मोदींनी केलं. मोदी म्हणाले, ``या सरकारनं देशाला खाली नेलंय. त्यामुळं त्यांनी आता जायला हवं. भाजप सरकार येण्यासाठी सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे”.
“२०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत १९७७ प्रमाणं सामान्य जनतेचा आवाज पुढं आला पाहिजे. आगामी निवडणूक ही पद मिळविण्यासाठी लढविणार नसून, सामान्य नागरिकांचे अश्रू पुसण्यासाठी लढविणार आहे. त्यामुळं परदेशात वास्तव्यास राहत असलेल्या नागरिकांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे”, असं आवाहनही मोदींनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना केलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, September 22, 2013, 10:26