Last Updated: Thursday, June 12, 2014, 19:24
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केवढा मोठा फरक आहे, हे लोकसभेतील पंतप्रधान झाल्यानंतर पहिलं भाषण ऐकल्यानंतर लक्षात येतं.
या भाषणावरून आपली कट्टर प्रतिमा बदलण्यामागे नरेंद्र मोदी लागले आहेत, असं दिसून येतंय.
या आधी निवडणूक प्रचारात भाषणांमध्ये आधी स्वतंत्रपणे बोलणारे मोदी, आता सर्वांना सोबत नेण्यासाठी जोर देत आहेत.
मोदी यांनी बदायूं रेप प्रकरणाचा उल्लेख तर केलाच, पण पुण्यातील मोहसिन हत्या प्रकरणावरही चिंता व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या काँग्रेसच्या सहकार्याचीही गरज असेल, असंही म्हटलंय
नरेंद्र मोदी यांनी यावेळी अनेक अशा गोष्टी सांगितल्या, ज्यात नरेंद्र मोदी यांचा सूर काँग्रेसशी मिळता जुळता होता. कारण मुसलमानांसाठी बनवण्यात आलेली धोरणं त्यांना आता आक्षेपार्ह वाटत नाहीत.
लोकसभेत बुधवारी बोलतांना नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी ज्या मुस्लिम बांधवांना लहानपणापासून पाहातोय, त्यांची तिसरी पिढीही आज सायकल दुरूस्तीचं काम करतेय, हे त्यांचं दुर्देव आहे. आम्हाला त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी लक्ष केंद्रीत करावं लागले.
मी अशा लोकांच्या जीवनात बदल करू इच्छीतो, जर एखाद्या व्यक्तीचा अवयव काम करत नसेल, तर अशा व्यक्तीला निरोगी म्हणता येत नाही, म्हणून अशा सर्व अंगांना तंदुरूस्त करावं लागले, यानंतरचं सामाजातील सर्व स्तरातील लोकांचा विकास होईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 19:24