नरेंद्र मोदींचे ६२व्या वर्षांत पदार्पण Narendra Modi turns 62

नरेंद्र मोदींचे ६२व्या वर्षांत पदार्पण

नरेंद्र मोदींचे ६२व्या वर्षांत पदार्पण
www.24taas.com, गांझीनगर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज 62वा वाढदिवस.. या वयातही मोदींची जिद्द आणि महत्वाकांक्षा एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. गुजरातवर अनभिषिक्त सत्ता मिळवणाऱ्या मोदींचं पुढचं मिशन आहे दिल्लीचं तख्त. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याच्या इर्षेनेचं मोदींनी आपली पुढची रणनिती आखलीय...

आज वयाची 62 वर्षे पुर्ण करणा-या नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला. गेल्या 10 वर्षांपासून गुजरातमधील सत्तेच्या चाव्या नेरंद्र मोदी यांच्या हातात आहेत.मात्र आता मोदी यांच लक्ष्य गुजरात नाही, तर दिल्ली आहे.. वाढदिवसाच्या निमित्ताने मोदी हे आज अंबादी मंदीरात पूजा करणार असून आपली रथ यात्रा पुढे सुरू ठेवणार आहेत.

7 ऑक्टोबर 2011 रोजी गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या मोदींची महत्वकांक्षा आणि सत्तेची समीकरणं पूर्णतः बदलली आहेत.

First Published: Monday, September 17, 2012, 17:18


comments powered by Disqus