आयएसओ 9001 सरकार; ही तर मोदींची इच्छा!, narendra modi wants, ISO 9001 certified government

'आयएसओ 9001' सरकार; ही तर मोदींची इच्छा!

'आयएसओ 9001' सरकार; ही तर मोदींची इच्छा!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

जगातील पहिलं ‘आयएसओ 9001’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर स्टॅन्डर्डायजेशन’ सर्टिफाईड सरकार म्हणून भारत सरकारचं नाव समोर यावं, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.

केंद्र सरकारचं ‘परफॉर्मन्स मॅनेजमेंट डिव्हिजन’चे सचिव प्रजापती त्रिवेदी यांनी सर्व मंत्रालय आणि विभागांना पत्र लिहून पंतप्रधानांची ही इच्छा त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम केलंय. ‘सामूहिक प्रयत्नांती आपण जगातील पहिलं ‘आयएसओ 9001’ सरकार बनवू’ असा विश्वास पंतप्रधानांनी या पत्रात व्यक्त केलाय.

याचा प्रमुख उद्देश म्हणजे सरकारच्या सर्व विभागांमध्ये झटपट निर्णय घेण्याची क्षमता वाढवणं आणि सरकारी बाबूंमध्ये थोडा ‘प्रोफेशनलिझम’ रुजवणं... त्यामुळेच पंतप्रधान आयएसओ सर्टिफिकेटला खूप महत्त्व देत आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ‘आयएसओ 9001’ सर्टिफाईडची जोड दिली होती. आता, केंद्र सरकारला आयएसओ सर्टिफाईड बनविण्यासाठी सर्व विभागांना तांत्रिक मदत पुरविण्याची जबाबदारी ‘परफॉर्मन्स डिव्हिजन आणि कॅबिनेट सचिवालया’ला देण्यात आलीय.

उल्लेखनीय म्हणजे, यूपीए सरकारनं आपल्या कार्यकाळात या योजनेच्या दिशेनं पहिलं पाऊल उचललं होतं. यासाठी परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम हा नवीन विभाग बनवण्यात आला होता. पण, काही वरिष्ठ मंत्र्यांच्याच विभागाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मात्र ही प्रक्रिया पुढे ढेपाळली.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 10:43


comments powered by Disqus