मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ची लोकसभा निवडणूक, Narendra Modi was given command of the campaign committee of 2014

मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ची लोकसभा निवडणूक

मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ची लोकसभा निवडणूक
www.24taas.com, झी मीडिया, पणजी

भारतीय जनता पक्षाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी एका छोटेखानी पत्रकाररिषदेमध्ये मोंदीच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या संसदीय बोर्डने प्रचार समितीची कमान बहाल केली आहे. भाजपच्या कार्यकारीणी बैठकीत मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनंतर मोदीच प्रचार प्रमुख होणार असे सांगण्यात आले होते. हे वृत्त अखेर खरे ठरले.

नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा होतात. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार पुढे करण्याची व्युहरचना बांधण्यात आली होती. मात्र, भाजपने सावध भूमिका घेत पंतप्रधान पदाचा उमेदवाराचा पर्याय खुला ठेवला आहे. मोदींना नाराज करणे भाजपला शक्य नव्हते. त्यामुळे मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखपदी बसविण्यात आलेय.


मोदींनी भारतमुक्त काँग्रेसची घोषणा करताना काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आमचा हा राष्ट्रीय संकल्प आहे, असे मोदी म्हणालेत. देशातील नागरिकांना काँग्रेसने फसविले आहे. केंद्र सरकारने लोकांचा विश्वास गमावलाय. काँग्रेसच्या पापांचे कारण जनतेचा राग आहे. त्यामुळे देशातून काँग्रेस हद्दपार करणे हाच आपला अजेंठा असल्याचे मोदी म्हणालेत.

दरम्यान, गोव्यातील तीन दिवशीय बैठकीकडे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पाठ फिरविल्याने चर्चा सुरू आहे. आडवाणी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मोदींना त्यांचा विरोध असल्याने म्हटले जात आहे. मात्र, त्यांची तब्बेत चांगली नसल्याचे स्पष्टीकरण राजनाथसिंग यांनी दिलेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 9, 2013, 14:22


comments powered by Disqus