Last Updated: Monday, November 4, 2013, 12:52
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीपाटणातल्या स्फोटानंतर नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत पुन्हा घातपात होण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागानं पंजाब पोलिसांना याबाबात इशारा दिला आहे.
शीख कट्टरपंथीयांकडून स्फोटांची शक्यचता असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. या आधी पाटणा इथं २७ ऑक्टोटबरला नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या पार्श्वपभूमीवर मोदी यांच्या पंजाब मधील प्रचारसभेत घातपात होण्याची शक्यंता गुप्तचर खात्याला मिळाली आहे.
पाकिस्तानी सीमेवरून काही शिख कट्टरपंथिय स्फोटकांसह घुसखोरी करण्याच्या तयारीत असून प्रचारसभेत घातपातासाठी स्फोटकांचा वापर केला जाईल अशी माहितीही मिळतेय. त्यामुळं पंजाब पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी देशभर प्रचार करत आहेत. त्यामुळंच आता मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. पाटणा साखळी स्फोटांनंतर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता मोदींच्या जीवाला धोका असल्याचा इशारा आयबीनं दिलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, November 4, 2013, 12:52