बँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर nationalize banks 2 days strike

बँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर

बँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर
www.24taas.com, झी मीडिया

बँकेशी संबंधित तुमचं आज आणि उद्या काही काम असेल, तर बँकेची फेरी तुम्ही न मारलेली बरी. कारण आज आणि उद्या देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे.

पगारवाढ आणि इतर कारणांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सार्वजनिक बँक क्षेत्रातील जवळपास दहा लाख कर्मचारी सोमवारी आणि मंगळवारी संपावर आहेत.

बँकांच्या संपामुळे पैशांसाठी एटीएम हा एकमेव पर्याय आहे. यामुळे पुढचे दोन दिवस एटीएमवर मदार असणार आहे. एटीएममध्ये नियमित कॅश भरणे.

या कामातही कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. म्हणून एटीएम सेवेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 10, 2014, 10:00


comments powered by Disqus