Last Updated: Wednesday, May 15, 2013, 08:52
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली भारतीय नौदलात आणखी एका कथित सेक्स स्कॅन्डल उघडकीला आलंय. यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीनं आपल्या पतीवरच आरोप ठेवलाय की, तो आपल्या सहकाऱ्यांबरोबर सेक्ससाठी आपल्यावर दबाव टाकतो. सुरक्षामंत्री ए. के. अँटनी यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.
सुरक्षामंत्री कमांडर्सच्या एका संमेलनात नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात कारवाईचे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण जाहीर झालंय. अँटनी यांच्या भेटीनंतर पीडित महिलेनं आपल्याला सुरक्षामंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन देण्यात आल्याचं सांगितलंय. पतीविरुद्धही विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं तिला सांगण्यात आलंय. तिचा लेफ्टनंट कमांडर या पदावर आहे. आपल्या सहकाऱ्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी तो आपल्यावर दबाव टाकत असल्याची तक्रार तिनं केलीय.
महिलेच्या म्हणण्यानुसार, या प्रकारानंतर ती आपल्या आईकडे राहायला आलीय. तिनं आपल्या पतीवर मानसिक आणि शारीरिक प्रतारणेचा आरोप ठेवलाय. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिनं या नौदलाच्या अधिकाऱ्याशी लग्नगाठ बांधली होती.
‘जर या गोष्टी उघड करण्याचा प्रयत्न केला तर नग्न फोटो इंटरनेटवर टाकण्याची’ धमकी आपल्या पतीनं दिल्याचंही या महिलेनं म्हटलंय. या तक्रारीवर तिच्या पतीचं म्हणणं जाणून घेण्यासाठी त्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतू तो होऊ शकलेला नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 15, 2013, 08:52