Last Updated: Tuesday, October 30, 2012, 16:23
www.24taas.com, नवी दिल्लीरविवारी कॅबिनेटमध्ये झालेल्या फेरबदलामध्ये मनुष्यबळ राज्यमंत्री झालेल्या शशी थरूर यांनी आपल्या पत्नीवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पण्णीवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नरेंद्र मोदींनी निवडणूक दौऱ्यात सोमवारी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील फेरबदलावर निशाणा साधला. आणि कॅबिनेटमध्ये पुन्हा एकदा सामावून घेणाऱ्या शशी थरूर यांच्यावर निशाणा साधताना त्यांची पत्नी सुंनदा पुष्करला ५० कोटींची गर्लफ्रेंड असं संबोधलं होतं.
शशी थरूर यांनी मंगळवारी ट्विटरवर ट्विट केलं की, माझ्या बायकोची किंमत ५० कोटीपेक्षा खूप जास्त आहे. पण हे समजण्यासाठी तुम्हांला (नरेंद्र मोदींना) कोणाशी तरी प्रेम करता यायला हवं.
हिमाचल प्रदेशात प्रचारार्थ झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शशी थरूर यांचं नाव न घेता त्यांच्या पत्नीवर बोचरी टीका केली. नरेंद्र मोदींनी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख ‘५० कोटींची गर्लफ्रेंड’ असा केला. निवडणूक सभेत मोदींनी जमावाला विचारलं, “वाह! क्या गर्लफ्रेंड है...कभी आपने देखी है ५० करोड की गर्लफ्रेंड?”
First Published: Tuesday, October 30, 2012, 16:07