नेट परीक्षेचा निकाल जाहीर, net exam result declared

नेट परीक्षेचा निकाल घोषित

www.24taas.com, नवी दिल्ली

नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेटचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशभरातील लेक्चरर पदासाठी ही परीक्षा बंधनकारक असते.

या परीक्षेमध्ये देशातील ४० हजार ३३२ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. जूनमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत नेटची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत ज्युनियर रीसर्च फेलोशीप म्हणजेच जेआरएफसाठी तीन हजार ६६२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

या परीक्षेचा तिसरा पेपरही वस्तुनिष्ठ करण्यात आला होता. त्यामुळे यंदा मागील परीक्षांच्या तुलनेत चौपट विद्य़ार्थी उतीर्ण झाल्याची माहिती नेट परीक्षा मंडळामार्फत देण्यात आली.

१९८९ सालापासून ही परीक्षा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये देशभरातील ८ ते १० हजार विद्यार्थी पास होत होते. बदललेल्या स्वरुपाबरोबरच आयोगाने विद्यार्थ्यांना `आन्सर की` सुविधाही उपलब्ध करून दिली होती.

First Published: Thursday, September 20, 2012, 09:20


comments powered by Disqus